Breaking News

बळी वर्षासहलीचे, खापर मात्र धरणावर!

खोपोली : प्रतिनिधी

वर्षा पर्यटनात खालापूर तालुक्यात दोन महिन्यांत पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू होऊनदेखील प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असून, ठोस कारवाईसाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

पावसाळा सुरू होताच तरुणाईला वर्षासहलीचे वेध लागतात. धबधबा, धरण परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात एक दिवसाची मौजमजा करण्यासाठी येतात. मुंबई, नवी मुंबईपासून वर्षा पर्यटनासाठी जवळचे ठिकाण म्हणजे खालापूर तालुका. निसर्गाची उधळण असलेला हा तालुका पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण  असते. डोंगरातून वाहणारे धबधबे, दुथडी भरून वाहणार्‍या धरणाच्या सांडव्यातील पाणी, त्यामध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या संख्येने येतात, मात्र अनेकदा त्या ठिकाणचे अज्ञान जीवावर बेतत असून, दुर्दैवी घटनेत तरुणाई बळी पडत आहे.

दोन वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे बंदिस्त तरुणाई वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडली आहे. खालापूर तालुक्यातील बोरगाव येथील धोंडेवाडी पोखरण धरणात 15 दिवसांत तीन तरुणांचा बळी गेला आहे.

या ठिकाणी सातत्याने दुर्घटना घडूनदेखील प्रशासनाने कोणतीही उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचललेले नाही. विशेषत: शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वीकेण्डला तरी तपासणी, तसेच दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले, तरी या ठिकाणी जाणारे बळी थांबतील, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply