Breaking News

मोदी सरकारचा चीनला पुन्हा दणका; पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली : मोदी सरकारने चीनला आणखी एक दणका दिला आहे. केंद्राने 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये पबजीचाही समावेश आहे. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला तणाव पुन्हा एकदा वाढला असून, गलवान खोर्‍याप्रमाणे पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्याने भारताने चीनविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितले. मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजीवर बंदी आणण्यात आली आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply