Breaking News

करंजा-रेवस तरसेवा सुरू

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश

उरण : वार्ताहर

करंजा ते रेवस तर (बोट) सेवा सोमवार (दि. 22) पासून सुरु झाली. उरणचे आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता.

तर (बोट) मध्ये 25 प्रवासी प्रवास करतील. सर्व प्रवाशांनी सामाजिक अंतर ठेऊन बोटीमध्ये प्रवेश आणि प्रवास करावा. बोट सकाळी 7 ते 10 व सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत चालू राहील. बोटीमध्ये 25 माणसे घेतले जातील. बोटीमध्ये मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. दुपारी तर (बोट) सेवा पासेंजर सोई नुसार सोडली जाईल. अशा प्रकारची नियमावली ठेवण्यात आली आहे. तर (बोट) करंजावरून सकाळी 7.30 ते सकाळी 10 वाजेपर्यंत संध्याकाळी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत शेवटची तर (बोट) असेल. रेवस वरून तर (बोट) सेवा सकाळी 7 ते सकाळी 10 संध्याकाळी 4 ते 6पर्यंत शेवटची तर असेल असे वेळापत्रक असेल.

कोरोना संसर्ग पादुर्भाव रोखण्यासाठी 22 मार्च 2020 रोजी पासून राज्यात सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले होते. 22  मार्च पासून करंजा रेवस ही तर (बोट) सेवा बंद करण्यात आली होती. ही सेवा पूर्ववत सुरु करण्याबाबत आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबईचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन संजय शर्मा व रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे प्रयत्न केले होते. त्यांना यश येऊन सोमवारपासून करंजा-रेवस तर (बोट) सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उरण ते अलिबाग व अलिबाग ते उरण आदी ठिकाणात जा-ये करणार्‍या नागरिकांची चांगल्याप्रकारे सोय झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आमदार बालदी यांचे आभार

मानले आहेत. अलिबाग येथे जाण्यासाठी करंजा येथून रेवस ह्या तरीने  (बोट) जलमार्गाने नागरिक प्रवास करीत असत व अलिबाग येथून करंजा (उरण) येथे येण्यासाठी रेवस ते करंजा या जलमार्गाने नागरिक प्रवास करीत असत परंतु कोरना संसर्ग प्रादुर्भाव होऊ नये त्या साठी 22 मार्च 2020 पासून हा जलप्रवास बंद करण्यात आला होता. त्यामुळे तर (बोट) सेवा बंद करण्यात आली होती. नागरिकांना अलिबाग जाण्यासाठी उरण ते पेण व पेण ते अलिबाग हा प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वेळ जास्त लागायचा व प्रवासाठी पैसेही जास्त मोजावे लागत असे अखेर करंजा ते रेवस तर (बोट) सेवा सुरु झाली असल्याने नागरिक आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply