Breaking News

तीन गावांमध्ये पुन्हा टाळेबंदी

पनवेल : बातमीदार

कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामस्थांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. खैरणेत मंगळवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली तर नावडे येथे बुधवारपासून टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. याशिवाय पेणधर ग्रामस्थांनी गुरुवापासून बंदीचा निर्णय जाहीर केला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना यातून सूट देण्यात आली आहे.

गावपातळीवर सहा ते दहा दिवस अशी टाळेबंदी अमलात आणली जाणार आहे. पनवेल तालुक्यात बाधितांची संख्या दोन हजार आणि मृतांची संख्या 70 झाली आहे. खैरणेत सहा दिवसांची टाळेबंदी असेल, अशी माहिती देण्यात आली. खैरणे गावात बाधितांची संख्या पाच आहे. खैरणे गाव औद्योगिक वसाहतीच्या मध्यभागी आहे. त्यामुळे येथे सुमारे दोन हजारांहून अधिक भाडेकरू कामगार राहतात. ढोंगर्‍याचा पाडा येथील बाजारपेठही बंद करण्यात येणार आहे. हा निर्णय 3 जुलैपर्यंत कायम असेल. नावडे येथे बाधितांची संख्या 12 झाली आहे. पेणधरमध्ये कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याने गावपातळीवर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात अली आहे.

गावपातळीवरील बंदीचा निर्णय पालिकेने घेतलेला नाही. ग्रामस्थांनी तो त्यांच्या पातळीवर घेतल्याचे समजते. वसाहतींमध्ये प्रत्येकाला शौचालय स्वतंत्र असल्याने फक्त संबंधित इमारतीचा तेवढाच भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. असे ग्रामीण भागात होत नाही. एका शौचालय व स्वच्छतागृहावर अनेक कुटुंबे अवलंबून असल्याने तेथे संसर्गाची भीती अधिक असल्याने या परिसरात बाधा झाल्यास तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो.

-सुधाकर देशमुख, आयुक्त, पमपा

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply