
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त स्थानिक स्वराज्य रिक्षा संघटना तळोजा व खारघर विभाग आणि गोल कातकरीवाडी येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत, उपाध्यक्ष शुभ पाटील, अक्षय पाटील, खजिनदार प्रमोद पाटील, प्रल्हाद गायकर, कृष्णा केसरकर, संतोष रेवणे, संदीप साळुंके, केशव गायकर, रितेश रघुराज आदी उपस्थित होते.