पनवेल : वार्ताहर
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला गुटखा व तत्सम पदार्थाची साठवणुक व विक्री करणार्या व्यक्तीच्या विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबईकडून सात लाख 15 हजारांच्या गुटख्यासह आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस आयुक्त सो. व मा. पोलीस सह आयुक्त सो. नवी मुंबई यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार नवी मुंबई, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त प्रविणकुमार पाटीळ, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन बी. कोल्हटकर, यांनी गुटखा व तत्सम पदार्थाची साठवणुक व विक्री करणारे इसमांचे विरूध्द कारवाई करण्याची मोहीम सुरू केली होती.
मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन. बी. कोल्हटकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे अधिकारी ब अंमलदार यांनी रबाळे एमआयडीसी येथील ईशीता हॉटेल, प्लॉट नं. 252, साईनगर, रबाळे येथे छापा टाकुन तेथे अवैैद्यरित्या विमल कंपनीचा गुटखा विक्री करत असतांना व्यक्ती (नाव-केराराम रूपाराम चौधरी, वय 33 वर्षे, व्यवसाय-हॉटेल व किराणा स्टोअर्स, रा. आदिवासी पाडा, साईनगर, रबाळे, नवी मुंबई, मुळ रा. मु. भादरडा, पो. लेदरमेर ता. भिनमाल, जि. जालोर राज्य राजस्थान) हा मिळुन आला. त्याचे ईशीता हॉटेलच्या काऊंटर व हॉटेलचे गोडावुन मध्ये प्रतिबंधीत विमल कंपनीचा गुटखा व व्ही-9 तंबाखु असा सुमारे 7,15,000 रूपये किंमतीचा माल मिळुन आल्याने त्याच्याविरूध्द रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर-149/2020, भा. दं. वि. कलम 188, 272, 273, 328, साथीचे रोग अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने नमुद गुटखा कोठुन आणला व कोणास विक्री करत होता याचा तपास सुरू आहे. सध्या चालु असलेल्या कोरोना रोगाच्या महाभयंकर संकटामध्ये नवी मुंबई पोलीस अतिशय व्यस्त असतांनाही वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, ज्ञानेश्वर भेदोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस हवालदार पोपट पावरा, प्रदिप कदम, पोलीस नाईक सागर हिवाळे, प्रकाश साळुंखे, सतिश चव्हाण, नवनाथ कोळेकर, सचिन धनवटे, विजय पाटील, रूपेश कोळी यांनी उल्लेखनिय कामगिरी केली असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भेदोडकर, मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा हे करत आहेत.