Breaking News

रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

पनवेल : बातमीदार

कोविड 19 मुळे जिल्ह्यातून कुशल, अकुशल कामगारांचे स्थलांतर झालेले आहे. त्यामुळे खाजगी आस्थापनांमध्ये कुशल/अकुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत 29 व 30 जून 2020  या दोन दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

त्यासा़ठी खाजगी आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेल्या कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती या विभागाच्या हीींिीं://ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप या वेबपोर्टल वर दि. 27 जून 2020 पर्यंत नोटीफाइड करावीत. ज्या आस्थापनांनी यापूर्वी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी  हीींिीं://ीेक्षसरी.ारहरीुरूरा.र्सेीं.ळप  या वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करावी व आपल्याकडील रिक्त पदे या विभागाच्या वेबपोर्टलवर दि. 27 जूनपर्यंत नोटीफाइड करावीत. नवीन नोंदणी करताना वेबपोर्टलवरील एाश्रिेूाशपीं-एाश्रिेूशी (ङळीीं र गेल)-ठशसळीींशी या ऑप्शन्सचा वापर करून आपल्या आस्थापनेची नोंदणी करावी. नवीन नोंदणी करताना आपले व्यवसाय सुरु करण्याबाबतचे प्रमाणपत्र (खपलेीिेीरींळेप उशीींळषळलरींश) नोंदणीमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.

वेबपोर्टलवर नवीन नोंदणी करणे व रिक्त पदे अधिसूचित करणे, या संदर्भात खाजगी आस्थापनांना काही समस्या उद्भवल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र.9820452264 यावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग शा. गि. पवार यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply