Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून सिंधुदुर्गातील शाळेला आर्थिक मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील करूळ पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या करूळ येथील कै. बॅ. नाथ पै शाळेला रायगड जिल्ह्याचे माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. या मदतीचा धनादेश कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष मोहन केळुसकर यांनी संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्याकडे अलिकडेच सुपूर्द केला.
30 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कै. बॅ. नाथ पै शाळेत करूळ पंचक्रोशीतील 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केलेल्या आर्थिक सहाय्यामुळे शाळेच्या विकासकामाला गती आता मिळेल व त्यामुळे रामशेठ ठाकूर यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो, असे संस्थाध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply