Breaking News

मुक्या प्राण्यांची काळजी घ्या!; प्राणीमित्रांचे आवाहन

पेण ः प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीत मुक्या प्राण्यांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट आहे. अन्न व खाद्यपदार्थांची दुकाने तसेच हॉटेल्स बंद असल्याने कचर्‍यात तसेच उकिरड्यावर पडलेले अन्नही भटक्या प्राण्यांना मिळत नाही. एप्रिलमध्ये उन्हाचा पारा वाढल्याने प्राणी-पक्ष्यांचा अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू होण्याची शक्यता असल्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन पेणमधील प्राणीमित्रांसह सजग नागरिकांकडून करण्यात येत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी नागरिकांप्रमाणेच प्राण्यांचीही काळजी घेण्याची गरज असल्याने पेणमधील पंख फाऊंडेशनच्या अध्यक्षा सीमा पुनमिया व सदस्य मागील चार वर्षांपासून प्राणी रक्षा ग्रुपतर्फे मुक्या प्राण्यांची सेवा करीत आहेत. लॉकडाऊनमध्येही त्यांच्याकडून प्राणीमात्रांची सेवा सुरूच आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply