Breaking News

रेवदंड्यातील विद्युतसेवा पूर्ववत

श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाने मानले डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आभार

रेवदंडा : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळात कोलमडलेली रेवदंड्यातील विद्युतसेवा डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली श्रीसदस्यांच्या बहूमोल सहकार्यातून पूर्ववत झाली. याबद्दल रेवदंड्यातील श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात 3 जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात रेवदंडा-थेरोंडा परिसरातील विद्युतसेवा पूर्णतः विस्कळीत झाली होती. विजेचे खांब निखळल्यानेे तसेच विद्युत तारा तुटून पडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. ही विद्युतसेवा सुरू होण्यासाठी किमान एक महिना लागेल असे चित्र दिसत होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीसदस्यांनी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासमवेत परिश्रम घेतले. त्याला यश येऊन विस्कळीत झालेली विद्युतसेवा लवकरात लवकर सुरू झाली.
या सेवाभावी कार्याबद्दल रेवदंड्यातील श्री शांतीनाथ जैन श्वेतांबर संघाच्या वतीने डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची थेरोंडा निवासस्थानी भेट घेऊन आभार मानण्यात आले.
या वेळी जैन संघाकडून अध्यक्ष दिनेश जैन, जेष्ठ कार्यकर्ते कनकराज जैन, हरमतराज जैन, भवरलाल जैन, वासनतलाल जैन, कांतीलाल जैन यांच्या हस्ते आप्पासाहेबांना आभारपत्र प्रदान करण्यात आले. सचिन धर्माधिकारी व अन्य सोबत होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply