Breaking News

गुजरातचा सलग दुसरा विजय; यूपीची हार

हैदराबाद : वृत्तसंस्था

गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रातील सलग दुसरा विजय मिळवताना यूपी योद्धाचा 44-19 असा धुव्वा उडवला. यूपी संघासाठी हा सलग दुसरा पराभव ठरला.

रोहित गुलियाची आक्रमणातील ‘सुपर टेन’ कमागिरी आणि परवेश भैसवाल याने पकडीमध्ये दिलेली ‘हाय फाईव्ह’ गुजरातच्या विजयात मोलाचे ठरले. गचिबोवली स्टेडियमध्ये यूपी योद्धाच्या नवख्या खेळाडूंकडून दडपणाखाली अनेक चुका झाल्या. त्यांच्या बचवाफळीमध्ये अनुभवाची कमतरता स्पष्टपणे दिसून आली. यूपीचा हुकमी खेळाडू मोनू गोयत केवळ 2 गुण मिळवू शकला. त्याउलट गुजरातकडून रोहितने 11 गुण मिळवत वर्चस्व राखले, तर परवेशने बचावात 6 गुण मिळवत यूपीला दडपणाखाली ठेवले. सचिननेही आक्रमणात 6 गुण मिळवत या दोघांना चांगली साथ दिली. सचिनने या वेळी लीगमध्ये आक्रमणात 300 गुण पूर्ण करण्याचा विक्रमही केला.

मध्यंतराला गुजरातने 19-9 अशी मोठी आघाडी घेत नियंत्रण राखले. यानंतर आपल्या खेळात आणखी वेग आणताना त्यांनी यूपीला पुनरागमनाची संधी दिली नाही. यूपीवर तब्बल तीन लोण चढवत गुजरातने आपला दबदबा राखला. अखेरची 7 मिनिटे शिल्लक असताना गुजरातने 32-13 अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply