पनवेल : रामप्रहर वृत्त : भारतीय जनता पक्ष पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र.19च्या वतीने पनवेलकरांसाठी गुढीपाडव्यानिमित्त ऑनलाइन क्वीझ स्पर्धा (जछङखछए टणखन उेाशिींळींळेप) आयोजित केली आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ुुु.रिीशीहींहरर्ज्ञीी.ळप या वेबसाइट भेट द्या. स्पर्धा ही गुढीपाडवाच्या दिवशी बुधवारी (दि. 25) सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असेल. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. तसेच शंभर भाग्यवान विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. ही स्पर्धा पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. 19 साठी मर्यादित असून सर्व वयोगटांसाठी खुली आहे. अधिक माहितीसाठी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर संपर्क-7502100100, 7757000000 येथे साधावा.