Breaking News

खालापूरजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात

दोघांचा मृत्यू, चौघे जखमी

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सोमवारी (दि. 29) सकाळी सव्वासातच्या सुमारास खालापूर टोलनाक्याजवळ तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर रस्त्यावरच आडवा मुंबईकडे जाणार्‍या वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
बोरघाटाच्या पायथ्याशी असणार्‍या ढेकू गावाजवळ कंटेनरने ट्रक, टेम्पो व कारला धडक दिली. यात कारचालक व अन्य एक जण जागीच मृत्युमुखी पडला, तर इतर चौघे जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटलेली नाही. या अपघातात कारचा चक्काचूर झाला तसेच ट्रक व टेम्पोचेही नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस मदत केंद्र, आयआरबी कंपनीचे देवदूत पथक, स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून, त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, तर जखमींना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply