मुरूड ः प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरने डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून अलिबागमधील मान्यवर डॉक्टरांचा तसेच अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांची सुश्रुषा करण्यात महत्त्वाचा वाटा असणार्या वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कामगारांचा सत्कार केला.
गेली 40-45 वर्षे अलिबाग व जिल्ह्यातील रुग्णांना अविरत सेवा देणार्या फिजिशियन डॉ. जॉर्ज मथाई, बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर व जनरल प्रॅक्टीशनर डॉ. महेंद्र दोशी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरचे अध्यक्ष डॉ. किरण नाबर, कार्यवाह निमिष परब, खजिनदार डॉ. राजेंद्र चांदोरकर तसेच मावळते अध्यक्ष जगदिश राणे, डॉ. निलेश म्हात्रे व सुधीर काटले उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील पहिले फिजिशियन असण्याचा मान डॉ. जॉर्ज मथाई, तर पाहिले बालरोगतज्ज्ञ असण्याचा मान डॉ. धामणकरांकडे जातो.
रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता म्हणून रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरने अलिबाग जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांचे प्रतिनिधी म्हणून सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद गवई यांचा सत्कार केला. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी डॉक्टर्स डेनिमित्त तसेच कोविडसंबंधी डॉक्टरांशी चर्चा करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात आल्याने त्यांचीही उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली.
कोविड नोडल अधिकारी डॉ. पडोळे, पॅथॉलॉजिस्ट व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, पॅथॉलॉजिस्ट डॉ. शीतल जोशी या वेळी उपस्थित होते. या वेळी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या प्रतिनिधी म्हणून मेट्रन मोरे यांचा तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांचे प्रतिनिधी म्हणून मुकादम राजेंद्र जाधव व काझी यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.