Breaking News

रायगड चाइल्ड लाइनकडून आदिवासींना मदतीचा हात

कर्जत ः बातमीदार – केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या मान्यतेने आणि दिशा केंद्र सामाजिक संस्थेच्या समन्वयाने रायगड जिल्ह्यात कार्यरत रायगड चाइल्ड लाइन 1098 या प्रकल्पाच्या वतीने कर्जत तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. त्या अनुषंगाने बीड (बू)वाडी व खाणीच्या वाडीतील आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.

चाइल्ड लाइन संस्था अडचणीत असलेल्या मुलांसाठी कार्यरत असून कोणीही पालक अथवा शेजारी मुलांच्या वतीने 1098 या 24 तास चालवण्यात येणार्‍या टोल फ्री हेल्पलाइनवर फोन करू शकतो. फोन आल्यानंतर तत्काळ अर्ध्या तासात त्या मुलांना मदत दिली जाते. चाइल्ड लाइन प्रकल्पाच्या वतीने ही मदत दिली जात असून पुढील सहा महिने ज्या कुटुंबांना गरज आहे अशा कुटुंबांना धान्याची मदत दिली जाईल, अशी माहिती समन्वयक वैष्णवी दभडे यांनी दिली. चाइल्ड लाइन प्रकल्पाचे संचालक अशोक जंगले, समन्वयक वैष्णवी दभडे, सदस्य कविता सूर्यवंशी, रेखा भालेराव, कॅन प्रकल्पाच्या विमल देशमुख आदींच्या टीमने आदिवासीवाडीवर जाऊन घरपोच धान्याचे किट वाटप केले. या वेळी त्या कुटुंबांना तांदूळ, डाळ, तेल, गरम मसाला, साखर, चहा पावडर आदींच्या किटचे वाटप बीडच्या कातकरवाडीत करण्यात आले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply