Saturday , March 25 2023
Breaking News

पेणच्या बालवीरांची सागरी चढाई

पेण : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किलोमीटरचे सागरी अंतर वैयक्तिकरित्या यशस्वीपणे पूर्ण करून पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या जलतरण मोहिमेत पेण येथील तीन जलतरणपटू सहभागी झाले होते. सकाळी 6.15 वाजता या सर्व जलतरणपटूंनी समुद्रात झेप घेतली. मधुरा गिरीश पाटील (वय 10) 3 तास 40 मिनिटे, भावेश नीलेश कडू (वय 10) 3 तास 18 मिनिटे, लावण्या शेखर घरत (वय 14) 3 तास 46 मिनिटे इतक्या वेळात जलतरणपटूंनी सागरी अंतर पूर्ण करण्याचा मान मिळविला. 19 किलोमिटरचे हे सागरी अंतर यशस्वीपणे पूर्ण करणार्‍या सर्व जलतरणपटूंचे गेट वे ऑफ इंडिया येथे स्वागत करून कौतुक करण्यात आले. भाजपचे जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेणच्या नगरसेविका ममता पाटील, महाराष्ट्र राज्य हौषी जलतरण संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शानबाग, सचिव राजेंद्र पालकर, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, प्रशिक्षक हिमांशु मलबारी, प्रषिक्षक संतोश पाटील, रायगडचे प्रशिक्षक अनिल कनघरे, सुनील पाटील यांनी सर्व जलतरणपटूंचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply