Breaking News

कारखान्यांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढ; व्यवस्थापनावर लगाम घालण्याची मागणी

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर खोपोली शहरात सह अन्य ठिकाणी कारखाने पूर्वी प्रमाणेच सुरू झाल्याने या कारखान्यात व्यवस्थापन विभागात काम करणारे काही कर्मचारी, अधिकारी हे कोरोनाग्रस्त तालुक्यासह मुंबई-पुणे या भागातून खोपोली खालापुरात येतात. परिणामी या रूपाने कोरोनाचे शिरकाव करून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात सर्वच कारखाने सुरु झाले असून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याचे स्थानिक कामगारांकडून बोलले जात आहेत. त्यामुळे कामगार वर्गाच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे जे-जा करणार्‍या अधिकारी व कर्मचारी यांच्या रूपाने खोपोली खालापूरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे या उच्चभू अधिकारी पदावर काम करणार्‍या नागरीकांनी बाजूला ठेवून कोरोना बाधित क्षेत्रात जाणे टाळावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. खालापूर तालुक्यात जवळपास 250  हुन  अधिक कारखाने आहे जवळपास सर्वच कारखाने सुरु झाले आहेत या कारखान्यात सुरक्षित अंतर ठेवावे असे सूचित करून सुरक्षेच्या दृष्टीने साधनांचा वापर करावा मात्र कार्यरत असणारे कारखाने किती सूचना पाळतात व प्रवासाची परवानगी घेतलेले अधिकारी कर्मचारी हे लागण झालेल्या शहरातून व पनवेल, उरण, खारघर, तळोजा सारख्या ठिकाणी ये-जा करीत असल्याने कोरोना बाधित क्षेत्रात येजा सुरूच ठेवल्यास बाधित रुग्नाचा आकडा वाढताच राहणार आहे. त्यामुळे खोपोली थोडीशी काळजी घेऊन हा प्रवास कुटूंबासाठी तरी टाळला पाहिजे त्यामुळे रुग्णांचा आकडा रोखणे शक्य होईल, असे भाजप शहर चिटणीस ईश्वर शिंपी यांनी सांगितले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी पेणमध्ये सभा

पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेते …

Leave a Reply