Breaking News

चित्रकलेतून घडविले विठूरायाचे दर्शन

मुंबई ः प्रतिनिधी

कोरोनामुळे यंदा वारकर्‍यांची पंढरीची वारी चुकली. परंतु विठूरायावरील नागरिकांचा भक्तीभाव तसूभरही कमी झाला नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावच्या अक्षय मेस्त्री या चित्रकाराने आपल्या कलेतून दाखवून दिले आहे.

अक्षयने गवाणे यांनी दीड एकर जमिनीत पावसाळी येणार्‍या गवतामध्ये भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. या चित्राची उंची 340 फूट तर रुंदी 155 फूट इतकी आहे. यासाठी प्रकाश पावरा, गुरूथास साटम, सिध्देश राने, रोहित वरक, शुभम राडये, ऋषिकेश आयरे, राकेश तोरस्कर, अनिकेत जाबसाडेकर आदींनी सहकार्य केले.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply