चिरनेर : रामप्रहर वृत्त – उरण तालुक्यातील जांभूळपाडा गावात कृषी दिन सप्ताहाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सींग पाळत हा कृषी दिनाचा कार्यक्रम मोजक्याच कृषी अधिकार्यांच्या व शेतकर्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. 1) साजरा करण्यात आला.
या नियोजित कृषी दिन व कृषी संजिवनीचे उद्घाटन उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांच्या हस्ते दिपज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या वेळी शेतकरी पद्माकर पाटील शशिकांत पाटील, हरिश्चंद्र पाटील, तुळशीदास पाटील, आदी उपस्थित होते.
तसेच मंडळ कृषी अधिकारी नागनाथ घरत कृषी सहाय्यक अधिकारी डि. टी. केणी आणि उरण तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी यांनी मग्रोरोहयो फळबाग बांधावर तूर व गिरीपुष्प झाडांची लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करून आंबा, भाजीपाला उत्पादनाबरोबर प्रत्येकी पाच देशी गायी पाळून त्याचे संगोपन करावे. हे चांगल्या प्रतीचे दुध असल्यामुळे देशी दुधाचा ब्रॅन्ड बनविण्याची नामी संधी आहे. ज्यामुळे आपले अर्थिक उत्पन्न वाढण्याला मदत होईल.
असेही सांगितले. दरम्यान, या वेळी पद्माकर मधुकर पाटील यांच्या शेतावर जावून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.