उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात मागील 10 ते 12 दिवस कडक ऊन्हामुळे भाताची रोपे करपून गेली. याशिवाय बाकी ठिकाणच्या शेतकर्यांच्या भाताची रोपे तयार झाली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतीची कामे रखडली होती. काल सकाळी 10 वाजल्यापासून तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने आत्ता शेतीच्या कामांना आत्ता खर्या अर्थाने वेग येणार असल्याने बळीराजा सुखावला आहे.
तर निसर्गातील पशुपक्षीही कडक उन्हाच्या तडाख्याने हैराण झाले होते. गावोगावच्या वस्तीत उष्णतेमुळे सापांचा वावर वाढला होता. त्यामुळे सर्प मित्रांचीही गावाकडे मोर्चा वळविलेल्या सापांना वाढविण्यासाठी धडपड अधिक सुरू होती. या शिवाय उंच डोंगरातील झरे, नद्या नाले वाहू लागले असून, शेतीलाही पूरक पाण्याची आवक वाढल्याने शेतीच्या कामांची लगबग अधिक प्रमाणात वाढणार आहे.
काल दिवसभरात झालेल्या जोरदार पावसामुळे झाडे, वेलीसह संपूर्ण निसर्गही खुलू लागला आहे. निसर्गात वावरणार्या वन्य पशुपक्षांसह सर्वांना थंडावा मिळाला आहे. त्यातच यंदा कधीनव्हे एवढ्या शतकात असा कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही येथील बळीराजा शेतीच्या मशागतीसाठी मेहेनत घेत असतांना दिसत आहेत. मागील काही दिवसात भातशेतीच्या रोपांचे नुकसान झाले मात्र काल झालेल्या दमदार पावसाच्या हजेरीने उरण तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे.