Breaking News

अपयशाचे खापर आयुक्तांच्या बदल्या करून फोडू नका!; देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

नवी मुंबई : बातमीदार

कोरोना महामारीच्या काळात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. एकत्र बसून काम केले तर प्रश्न सुटण्यास मदत होईल. मात्र तरीही आम्ही आमच्यापरीने मदत करतच आहोत. सरकार आपले असताना आपल्या अपयशाचे खापर आयुक्तांवर फोडून त्यांची बदली करणे चुकीचे असल्याचे सांगत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना

टोला हाणला.

आयुक्तांच्या बदल्या करणे चांगली स्ट्रॅटेजी नाही. मात्र पालकमंत्र्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे मविआत मंत्र्यांमध्ये समन्वयचा अभाव दिसून येतो. शनिवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी कोविड विरुद्ध सुरू असलेल्या कामकाजाच्या पाहणीसाठी पनवेल व नवी मुंबई महापालिकेला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

तसेच ते पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरात रुग्णसंख्या वाढली आहे. शासकीय रुग्णलयांत जागा उरलेली नाही. बेड उपलब्ध होत नाहीत. खासगी उपचार रुग्णांना परवडत नाहीत. महात्मा जन आरोग्य योजनेची काटेकोर अंमलबाजवणी करा अशा सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. सामान्य आजारांसाठी वाशी रुग्णालय खुले करावे. टेस्टिंग वाढवाव्यात. अन्यथा संक्रमण वाढेल. रॅपिड टेस्टिंग किट उपलब्ध झाले आहेत. एपीएमसी पूर्ण बंद करणे अशक्य आहे. एपीएमसीत बाहेरून येणार्‍यांमुळे कोरोना वाढतोय त्यासाठी त्यामुळे स्क्रिनिंग व रॅपिड टेस्टिंग करणे गरजेचे आहे. निकष व नियम ठरवून राज्यातील उद्योगांना चालना देणे गरजेचे आहे. नियम धब्यावर बसवून मदत करणे चुकीचे आहे असेही फडणवीस म्हणाले.

या वेळी देवेंद्र फडणवीसांनी वाशी येथील रुग्णालयाचा व सिडको कोविड सेंटरचा पाहणी दौरा केला. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, माजी महापौर जयवंत सुतार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत उपस्थित होते.

  • लॅबचे काम वेगात पूर्ण करा आमदार गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे यांनी पालिकेला निधी दिला आहे. स्वतःची लॅब उभी करणे कठीण काम नाही. मान्यता आपल्या राज्यातून मिळवता येते. मी स्वतः दोन ते तीन लॅबला मान्यता मिळवून दिली आहे. असे म्हणत लॅबचे काम वेगात पूर्ण करा अशा सूचना फडणवीसांनी आयुक्तांना दिल्या.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply