Breaking News

अनिल देशमुख यांची आर्थर रोेड तुरूंगात रवानगी

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : प्रतिनिधी
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानेदेखील (ईडी) या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. त्यांच्या ईडी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी (दि. 15) न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी कोर्टाने देशमुख यांची 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply