Breaking News

रायगडात सलग दुसर्‍या दिवशी पाच जणांचा मृत्यू; 262 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 5) सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचे पाच बळी गेले असून, 262 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल, उरण, खालापूर, कर्जत व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल मनपा हद्दीत 145, पनवेल ग्रामीणमध्ये 39, उरण तालुक्यात 23, खालापूर व रोहा तालुक्यात प्रत्येकी 10, पेण नऊ, श्रीवर्धन सात, कर्जत व अलिबाग तालुक्यात प्रत्येकी सहा, माणगाव चार, महाड दोन आणि सुधागड तालुक्यातील एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 5335वर गेला असून, मृतांची संख्या 154 इतकी झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात 131 रुग्ण बरे झाल्याने कोरोनावर मात करणार्‍यांची एकूण संख्या 2905 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2276 सक्रिय रुग्ण आहेत. 

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply