Breaking News

बीसीसीआयकडून सैन्य दलांना 20 कोटींची मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आयपीएल-12मधील सलामीच्या सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) सैन्य दलांना 20 कोटी रुपयांची मदत देण्यात आली. त्यासाठी चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये सशस्त्र सेना दलांना सन्मानित करण्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात भारतीय लष्कराला 11 कोटी, सीआरपीएफला 7 कोटी आणि वायु दल व नौसेनेला प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत बीसीसीआयकडून करण्यात आली. कार्यक्रमाआधी लष्कराच्या मद्रास रेजिमेंट बँडचे वादन झाले.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दरवर्षी जल्लोषात रंगतो, पण या वेळी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा उदघाटन सोहळा रद्द करण्यात आला. या सोहळ्यासाठी होणार खर्च हा शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतनिधी म्हणून देण्यात आला.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply