Breaking News

पनवेल तालुक्यात 114 नवीन रुग्ण; एकाचा मृत्यू, 174 रुग्णांची कोरोनावर मात

पनवेल ः प्रतिनिधी 

पनवेल तालुक्यात मंगळवारी 114 नवीन रुग्ण आढळले असून, एकाचा मृत्यू झाला आहे, तर 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी 90 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,  तर 93 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. पनवेल ग्रामीणमध्ये 24 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 81 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात 90 नवीन रुग्ण आढळले. पनवेल कच्छी मोहल्लामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कळंबोलीत 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 514  झाली आहे. कामोठेमध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 719 झाली आहे. खारघरमध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्याही 621 इतकी झाली. 

नवीन पनवेलमध्ये 12 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 486  झाली आहे. पनवेलमध्ये 13 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 583  झाली. तळोजात सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णसंख्या 149 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 3072 रुग्ण झाले असून, 1797 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 58.50 टक्के आहे. 1190 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 85 जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 24 नवीन रुग्ण आढळले असून 81 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आदई सात, पळस्पे दोन, वावेघर दोन, आंबे तळोजे, बंबावीपाडा, भिंगार, डोलघर, कोळेवाडी, कोपर गव्हाण, मोहो, नांदगाव, सुकापूर, वहाळ वलप आणि विचुंबे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 966 कोरोना रुग्ण झाले असून, 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply