Breaking News

उरणमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढविला

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर सुरू असणार्‍या दहा दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावधी आणखीन वाढविण्याचा निर्णय उरणच्या प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 13 ते 16 जुलै असा  लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

साथरोग अधिनियमन 1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपती व्यवस्थापन अधिनियमन 2005 च्या सर्व संबंधीत तरतुदीसह प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच मा.जिल्हाधिकारी रायगड यांच्या पूर्व मान्यतेने उप विभागीय अधिकारी पनवेल यांनी संपूर्ण उरण तालुका कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. दिनांक 13 जुलै सकाळी 5 ते 16 जुलै 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार कालावधी वाढविण्यात येईल तसेच संपूर्ण उरण तालुक्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उप विभागीय अधिकारी (पनवेल) दत्तू नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे. या कालावधीत नियमांच्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती/संस्था यांचेवर महामारी रोग अधिनियम 1897 आपती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या अंतर्गत इतर संबंधीत कायदे व नियमांच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. किराणा व भाजीपाला यांची घरपोच सेवा (होम डिलिवरी) सेवा सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत चालू ठेवता येईल. जे इंडस्ट्रीयल युनिट सद्यस्थितीत सुरु आहेत ते तसेच सुरु राहतील. अशी माहिती उप विभागीय अधिकारी (पनवेल) दत्तू नवले यांनी दिली.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply