Breaking News

रोह्यात पाकिस्तानी झेंड्याचे दहन

धाटाव : प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी जम्मू-काश्मीरमधील भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेचा शुक्रवारी (दि. 30) युवा मोर्चाच्या वतीने रोह्यात निषेध करण्यात आला.

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील व प्रदेश उपाध्यक्ष तथा रायगड संघटक प्रमुख निखिल चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी रोह्यात पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन करीत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमरदीप म्हात्रे, विलास डाके, शिवाजी दिवकर, मयुर डाके, राहुल खैरे, सुरज मोरे, गोखरण भाई यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply