Breaking News

जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सात वर्षांनंतर सुरू

अलिबाग : प्रतिनिधी

येथील जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट मागील सात वर्ष बंद होती. त्यामुळे या रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असे. सामाजिक संस्थांनी ही लिफ्ट सुरु करावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाला विनंती केली होती, अखेर ही लिफ्ट सुरु झाली असल्याने रुग्णांबरोबरच रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले आहे.जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्रसुतीकक्ष आहे. येथेच ऑपरेशन कक्ष आहे. दुसर्‍या मजल्यावरील सर्जिकल  विभागात दाखल होणार्‍या रुग्णांना लिफ्ट नसल्याने जिन्याने चालत आणावे लागत असे.  गरोदर, वृद्ध, अपंग रुग्णांच्या नातेवाईकांनाही याचा त्रास जाणवत असे. 1985च्या दरम्यान रुग्णालयाची इमारत बांधताना दोन लिफ्टची सुविधा ठेवण्यात आली होती. परंतु कालांतराने यातील एका लिफ्टमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरी लिफ्ट दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली होती. या दोन्ही लिफ्ट तब्बल सात वर्षे दुरुस्तीच्या कामासाठी बंद होत्या. अखेर यातील एक लिफ्ट सुरु झाली असून दुसरी लिफ्टदेखील काही दिवसातच सुरु होणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट सुरु करावी, यासाठी अनेकांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यासाठी आंदोलनही करावे लागले होते. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आर्थिक मदत केली, यामुळे हे काम होऊ शकले. याठिकाणी चार लिफ्ट गार्डस असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. -दिलिप जोग, सामाजिक कार्यकर्ते, अलिबाग

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply