पनवेल : रामप्रहर वृत्त
ग्रामपंचायतीच्या वित्त आयोग निधी अंतर्गत सांगडे हनुमान मंदिर येथे दोन लाख 35 हजार रुपये खचून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ शनिवारी (दि.29) झाला.
या वेळी राजिपचे माजी सदस्य आणि भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, सरपंच नामदेव पाटील, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य रमेश गडकरी, सदस्य सूर्यकांत पाटील, भाजप सांगडे गाव अध्यक्ष भालचंद पाटील, अजित पाटील, आदिनाथ पाटील, सुबोध पाटील, निलेश पाटील, रमेश पाटील, विकास गाताडे, सुरज पाटील, मंगेश पाटील, रामचंद्र पाटील गुरुजी आदी उपस्थित होते.