Breaking News

कर्जतमध्ये नॅपकीन, डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन

कर्जत : प्रतिनिधी

येथील नगर परिषदेने सॅनिटरी नॅपकीन व डायपरचे विघटन करण्यासाठी मशिन बसवली आहे. संपूर्ण कोकणात फक्त कर्जत नगर परिषदेच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पाच कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान मिळाले आहे. त्यातील पहिले अडीच कोटी रुपयांचे अनुदान घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि नळपाणी योजना यावर खर्च केले जाणार आहेत. या निधीतून सुमारे तीन लाख रुपये खर्च करून नगर परिषदेने नॅपकीन, डायपरचे विघटन करण्यासाठी अतिशय नावीन्यपूर्ण मशिन घेतले आहे. यामध्ये सॅनिटरी नॅपकीन व डायपर याचे कुठलेही प्रदूषण न होता विघटन होते आणि उरलेल्या राखेचा खत म्हणून वापर केला जातो. कर्जत नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी हे मशिन बसविण्यात आले आहे. नुकतीच त्याची डेमोसह माहिती देण्यात आली. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पाणी पुरवठा सभापती संचिता पाटील, महिला बाल कल्याण सभापती विशाखा जिनगरे, मागासवर्गीय कल्याण सभापती वैशाली मोरे, नगरसेविका स्वामिनी मांजरे, पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, भारती पालकर, सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे, माजी नगरसेविका बिनिता घुमरे यांच्यासह स्थापत्य अभियंता निलेश चौडीए, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, सुनील लाड, सामाजिक कार्यकर्ते राहुल कुलकर्णी, नगर परिषद कर्मचारी दिनेश हिरे, कुमार परदेशी, सुनील सुर्वे, बाळकृष्ण बनसोडे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply