Breaking News

देशात कोरोनाचा नवा उच्चांक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात उपचार घेणार्‍या रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर घालणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रविवारी (दि. 12) सकाळी संपलेल्या 24 तासांत 28 हजार 637 नव्या रुग्णांची भर पडली, तर 551 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील आतापर्यंतचा हा सर्वांत मोठा आकडा आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेआठ लाखांच्या वर गेली असून, आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पाच लाखांहून अधिक रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत, तर पावणेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातही विक्रमी वाढ

महाराष्ट्रात दिवसभरातील सर्वांत मोठ्या रुग्णसंख्या वाढीची नोंद झाली. राज्यात मागील 24 तासांत आठ हजार 139 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, तर 223 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या सुमारे अडीच लाख झाली आहे. यापैकी सव्वा लाखाहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात आजघडीला लाखभर सक्रिय रुग्ण आहेत, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10 हजारांच्या वर गेली आहे.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply