Breaking News

नाना पोरे भाजप वाहतूक सेल जिल्हा संयोजकपदी

महाड ः प्रतिनिधी

महाड तालुक्यातील तरुणांचे नेतृत्व समजल्या जाणार्‍या नाना पोरे यांच्यावर भाजपच्या वाहतूक सेलच्या जिल्हा संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखविलेला हा विश्वास आपण सार्थ करू, असा विश्वास पोरे यांनी व्यक्त केला.

महाड शहरातील तरुणांचे नेतृत्व करणारे संकेत उर्फ नाना पोरे यांनी नुकताच त्यांच्या असंख्य सहकार्यांसह विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांच्या येण्याने भाजपत तरुणांची एक मजबूत फळी येत्या नगरपालिका निवडणुकीत सक्रिय होणार आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत दरेकर आणि माजी पालकमंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पोरे यांची भाजपच्या वाहतूक सेल जिल्हा संयोजकपदी नियुक्ती जाहीर केली.

दरम्यान, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर आणि तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्या हस्ते पोरे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. पक्षवाढीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून, भविष्यात असंख्य तरुण भाजपत सक्रिय होणार असल्याचा दावा पोरे यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

माथेरानमधील हातरिक्षा संघटनेच्या आणखी सात सदस्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी माथेरानमधील हातरिक्षाचालक संघटनेच्या आणखी सात …

Leave a Reply