
कर्जत ः बातमीदार
अंदाजे 16 ते 18 दरम्यान वय असलेली एक गतिमंद-मतिमंद बालिका मौजे चारफाटा, कर्जत येथे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भालीवले यांना 28 जून रोजी आढळली आहे. या बालिकेबाबत सर्व ठिकाणी विचारपूस केली असता ती कोणाच्याही ओळखीची नसल्याचे आढळून आले. याबाबत स्वप्नील भालीवले यांनी कर्जत पोलीस ठाणे यांना कळविले असून पोलिसांनी तिला तिचे नाव-गाव विचारले असता या मुलीला तिचे स्वत:चे व पालकांचे नाव सांगता येत नव्हते. बालिकेस बालकल्याण समितीच्या आदेशाने नेरळ येथील आसरा शेल्टर बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
त्या मुलीचे समुपदेशन केल्यानंतर बालिकेने आपले नाव कु. प्रिती सुरेश रावते असल्याचे सांगितले आहे. ही बालिका जर कोणाच्या ओळखीची अथवा जवळपासची रहिवासी असल्यास संबंधितांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग, 02141-225321 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा संस्थेच्या अधीक्षिका सुवर्णा पिंगळे 8378034582 अथवा कर्जत पोलीस ठाणे 02148-222100 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षिका सुवर्णा पिंगळे यांनी केले आहे.