Breaking News

मोहोपाडा हद्दीतील 83 रुग्ण कोरोनामुक्त

रसायनीकरांना दिलासा

मोहोपाडा : प्रतिनिधी – कोरोना या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र राज्यातही कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच आहे. कोरोना या विषाणुची सर्वत्र भिती असली तरी नागरिक गंभीर दखल घेताना दिसत नसल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे दिसून येते. रसायनी परीसरातील वासांबे मोहोपाडा परीसरात कोरोनाने शिरकाव करुन भयभीत वातावरण निर्मिती केली आहे. परंतु येथे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने रसायनीकरांना दिलासा मिळत आहे.

वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोनाचा फैलावर वाढून गुरुवारी  नव्याने पाच जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून वासांबे (मोहोपाडा) हद्दीत एकूण 138 व्यक्ती कोरोनाने बाधित झाले आहेत. त्यातील आजपर्यंत जवलपास 83 जणांनी कोरोनावर मात करुन घरी सुखरूप परतले आहेत. गुरुवारी (दि.16) मोहोपाडा एक, नवीन पोसरी एक, भटवाडी दोन, कालणवाडीनजीक रिस नवीन वसाहत एक असे पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वासांबे (मोहोपाडा) हद्दितील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पहावयास मिळत असून चालू लॉकडाऊनच्या शेवटपर्यंत वासांबे (मोहोपाडा) हद्दित कोरोना हद्दपार होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसाचा परिसराचा आढावा घेतला असता रसायनीकर लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत असल्याचे दिसून आले. महिना अखेर कोरोना रसायनीसह वासांबे (मोहोपाडा) हद्दितून नेस्तनाबूत होईल यात तिळमात्र शंका नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला घाबरून जाऊ नये, स्वत:ची रोगप्रतिकारशक्ती वाढवा, कोरोना आपोआप गायब होईल. यासाठी वासांबे (मोहोपाडा)ग्रामपंचायत, चांभार्ली, वावेघर व नजीकच्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी, सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे.

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी चालू असलेल्या लॉकडाऊनचे काटेकोर पालन करुन स्व:ताची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन होत आहे. कोरोना हा गंभीर आजार नसून घाबरून जाऊ नये, आपणास आजाराची लक्षणे दिसत असतील तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा, सोशल डिस्टस्निगंचे तंतोतंत पालन करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply