माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या आदेशाने तालुका महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी माणगाव शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील सक्रिय कार्यकर्त्या दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित केली. बुधवारी (दि. 15) पक्ष कार्यालय माणगाव येथे दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे व तालुका महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून दीपाली जाधव यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.पक्षसंघटन वाढीसाठी असणारी त्यांची तळमळ नजरेसमोर ठेवून पक्ष नेतृत्वाने त्यांना माणगाव शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. याबद्दल दीपाली जाधव यांनी सांगितले की, मला शहराध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी पक्ष नेतृत्वाचे आभार व्यक्त करते. पक्षाचे काम यापुढेही जोमाने करून पक्षाचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम करून महिला संघटन मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपाली जाधव यांची माणगाव शहर भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे माणगाव तालुका भाजप सरचिटणीस योगेश सुळे, उमेश साटम, जिल्हा युवा मोर्चाचे चिन्मय मोने, इंदापूर विभाग भाजप अध्यक्ष बाबूराव चव्हाण, निजामपूर विभाग अध्यक्ष संजय जाधव, इंदापूर विभाग अध्यक्ष संतोष कदम, संजय सावंत, योगेश बेंडखळे, तुषार नवगणे, विशाल गलांडे, राजू मुंढे, विश्वजित पाटील, भोईर आदींसह पक्ष कार्यकर्ते तसेच महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper