माणगाव : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करून बदनामी करणार्या एका शिक्षकाविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी या नराधम शिक्षकाला अटक केली आहे.
माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक मदन प्रल्हाद वानखेडे याने सन 2016पासून 5 जानेवारी 2021पर्यंत त्याच्याच इमारतीत राहणार्या मुलीला तिच्या आईची नोकरी घालवण्याची तसेच पीडितेस परीक्षेत नापास करण्याची व तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वेगवेळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. त्याचप्रमाणे पीडितेच्या मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून तिची बदनामी केली आणि इन्स्टाग्रामवर पीडितेच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करून तिच्या मित्र-मैत्रिणींना बदनामीकारक मेसेज पाठविले.
या प्रकरणी पीडित मुलीने अखेर माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मदन वानखेडे याच्यावर भा. दं. वि. कलम 376 (2) (एन), 500, 506, सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012चे कलम 3, 4 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66 (सी) अन्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper