Breaking News

पनवेलसह नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

पनवेलसह नवी मुंबई विभागात मागील दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पनवेलमध्ये दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरात नागरिकांची वर्दळ कमी पहावयास मिळाली. तसेच नवी मुंबईत दोन ठिकाणी किरकोळ आगीच्या घटना घडल्या. पावसाळा सुरु झाल्यापासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1061.12 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर पनवेल महापालिका क्षेत्रात बुधवारी (दि. 15) 80 मी.मी पावसाची नोंद झाली आहे. सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गांवर काही ठिकाणी या वेळी पाणी साचल्याचे पाहवयास मिळाले. लॉकडाऊनमुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने कोठेही वाहतूककोंडी झाली नाही. तालुक्यातील गाढी, तसेच कासाडी नदी दुथडी भरून वाहत होती.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply