Breaking News

पेणच्या गणेशमूर्ती उरणमध्ये दाखल

उरण : वार्ताहर

गणपती बाप्पाचे आगमन थोड्या दिवसात होणार असून उरण शहरात पेणचे सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती उरणमध्ये दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे मूर्ती दुकानात पाहण्यापेक्षा मोबइल मधील व्हॉट्सअ‍ॅप द्वारे फोटो पाठवून गणेशभक्त गणेशाची मूर्ती पसंत करत आहेत, असे चित्र सर्वत्र पाहवयास आहेत. यंदा कमी उंचीच्या गणेशमूर्तींना मागणी जास्त आहे.

उरण शहरात गणेश कला केंद्र, लंबोदर चित्र शाळा, अष्टविनायक कला केंद्रे, रिद्धी-सिद्धी कला केंद्र, विघ्नहर्ता कला केंद्र, जगे यांचे श्री सिद्धिविनायक कला केंद्र आदी नावाने गणेश मूर्ती दुकाने बाजार पेठेत थाटण्यात आली आहे. कोरोनामुळे यंदा गणेश मूर्ती बनविण्यास उशीर झाल्याने व कारागीर उपलब्ध न झल्याने व गणपती सणाला थोडेच दिवस राहिल्याने कारागीर गणपती सजावटीमध्ये मग्न झालेले आहेत. सजावटीमध्ये मुकुट, पितांबर, हातातील कडे व अंगावरील विविध अलंकार हे रंगविण्यात मग्न झाले आहेत.

उरण बाजार पेठेतील राजपाल नाका जवळील जगे यांचे श्री सिद्धिविनायक कला केंद्र मध्ये पेणचे प्रसिद्ध, सुबक व आकर्षक गणेशमूर्ती विकावयास आल्या आहेत. यंदा मूर्तींच्या किंमतीत 10% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे तीन फुटापर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती विकावयास आल्या आहेत. कै. किशोर जगे यांचे श्री सिद्धिविनायक कला केंद्र हे 30 वर्ष जुने असून त्यात शैलेश शेट्टे, भावना पाटील, अक्षया पाटील व जगे कुटुंबिय काम करते. यंदा एक ते तीन फुट उंचीपर्यंत गणेशमूर्ती आणले असून पेणच्या सुंदर सुबक आकर्षक मूर्ती आणयला आहेत, असे जगे यांचे श्री सिद्धिविनायक कला केंद्राचे जगे कुटुंबीयांनी सांगितले.

Check Also

अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीचा प्रश्न विधिमंडळात!

प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी मुंबई …

Leave a Reply