मुंबई ः प्रतिनिधी
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अमली पदार्थविरोधी दलाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांना पाठिंबा व्यक्त करतानाच कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मोठा आरोप केला आहे. वानखेडे हे अतिशय कार्यशील अधिकारी असून त्यांनी 25 कोटींची लाच मागितली असे सांगण्यासाठी एनसीबीचे पंच प्रभाकर साईलला पैसे देण्यात आले, असा खळबळजनक आरोप केंद्रीय मंत्री आठवले यांनी केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी रविवारी (दि. 31) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या वेळी वानखेडे कुटुंबीयांनी आठवले यांना उपलब्ध सर्व कागदपत्रे दाखवली. त्यानंतर आठवलेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी वानखेडेंवर आरोप करणारे राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …