Breaking News

रोजगार मेळाव्यात पाच हजार उमेदवारांचा सहभाग

पनवेल : जिमाका

उद्योग विभागाच्या वतीने आज (दि. 22) पनवेल येथे आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात तब्बल पाच हजार गरजू उमेदवारांनी नोंदणी करून सहभाग दिला. या उमेदवारांच्या मुलाखती व निवड प्रक्रिया  उशिरापर्यंत सुरू होत्या.

 राज्यातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी, औद्योगिक क्षेत्रामधील आवश्यकता व स्थानिक बेरोजगारांकडे असलेले कौशल्य यांचा योग्य तो ताळमेळ करुन जिल्हास्तरीय रोजगार व स्वयंरोजगाराद्वारे रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पनवेल येथे पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनियरींग, पिल्लई कॅम्पस न्यू पनवेल येथे उद्योग विभागाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार मनोहर भोईर, पनवेल  महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल, विभागीय संचालक एमआयडीसी सतिश बागल, उद्योग सहसंचालक उद्योग संचालनालय मुंबई सदाशिव सुरवसे, उद्योग सहसंचालक कोकण विभाग ठाणे शै. गि. राजपूत, उद्योग उपसंचालक श्रीमती देवराज, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक संदिप पाटील,  पिल्लई कॉलेज प्रिंसिपल जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील मोठे व मध्यम उद्योग, व्यापारी आस्थापना, हॉटेल्स, रुग्णालय, मॉल्स, बांधकाम व्यावसायिक यांना आवश्यक मनुष्यबळाची निकड बेरोजगार तरुण, तरुणींकडे असलेली शैक्षणिक पात्रता कौशल्य याबाबत समन्वय करुन मेळाव्यात आलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, या मेळाव्याचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, अशा प्रकारच्या मेळाव्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. शासनाच्या विविध योजना तळागाळा पर्यंत पोहचल्या पाहिजेत.

यावेळी आमदार मनोहर भोईर, महापौर कविता चौतमल यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.

या मेळाव्यात तीन हजार उमेदवारांनी आपले अर्ज  नोंदणी केले आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज, तसेच कॉल सेंटरद्वारेही नोंदणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत सहसंचालक उद्योग सुरवसे आणि राजपूत यांनी केले. सहभागी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी 84 उद्योग आस्थापना उपस्थित होत्या.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply