नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या शनिवारी झालेल्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राम मंदिर शुभारंभ सोहळ्याला 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. पंतप्रधान मोदी या ठिकाणी 11च्या सुमारास पोहचतील. ‘पीएमओ’मधील सूत्रांनुसार या सोहळ्याची संपूर्ण आखणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर चर्चा करण्याबरोबरच मंदिराचा नकाशा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात विविध बदल करण्यात आले आहेत. कोरोनाची परिस्थिती हाताळल्यानंतर यासाठी निधी गोळा केला जाईल. प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य-दिव्य मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत तयार होईल, असा अंदाज आहे.