पाच जणांचा मृत्यू; 117 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 19) कोरोनाचे 181 नवीन रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे तर 98 रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. ग्रामीणमध्ये 42 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 19 रुग्ण बरे झाले आहेत. तर एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठे येथील नवपाडा पोस्ट ऑफिसजवळ, सेक्टर 24 तिरुपती आर्केड, सेक्टर 16 सिल्वर स्टार सोसायटी व कळंबोलीत रोडपाली येथील प्रत्येकी एक अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 34 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 840 झाली आहे. कामोठेमध्ये 19 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1019 झाली आहे. खारघरमध्ये 24 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 953 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 799 झाली आहे. पनवेलमध्ये 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 990 झाली आहे. तळोजामध्ये आठ नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 277 आहे. महापालिका क्षेत्रात एकूण 4878 रुग्ण झाले असून 3333 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.33 टक्के आहे. 1431 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 114 जणांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये करंजाडे सेक्टर 6, प्लॉट नं. 93 येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर आढळलेल्या रुग्णांत उलवे नऊ, देवद चार, गव्हाण चार, सुकापूर चार, करंजाडे तीन, विचुंबे तीन, पाले बुद्रुक तीन, आदई दोन, पोयंजे दोन, आजिवली, चावणे, चिंचवण, चिंचवली, खारकोपर, कोळखे, वहाळ, विहीघर येथे प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात 1561 रुग्ण झाले असून 1027 जणांनी कोरोनावर मात केली असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 288 जण कोरोनाबाधित
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत रविवारी 288 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोना बधितांची एकूण संख्या 11 हजार 426 झाली आहे. तर 225 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची एकूण संख्या सात हजार 213 झाली असून नवी मुंबईचा रिकव्हरी रेट 63 टक्क्यांवर स्थिरावला आहे. रविवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 343 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत 29 हजार 238 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 17 हजार 426 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 870 रुग्ण उपचार घेत आहेत. आढळलेल्या रुग्णांची विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 30, नेरुळ 56, वाशी 15, तुर्भे 27, कोपरखैरणे 56, घणसोली 59, ऐरोली 36 व दिघा 9 असा समावेश आहे.