Breaking News

सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती

पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे.

Organic manure to be made solar energy | सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती
सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती

कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे. याकरिता आवश्यक वीज सौर ऊर्जेतून घेण्यात येत आहे. यामुळे विजेची बचत होणार आहे शिवाय कचºयाची समस्याही निकाली काढण्यात बºयापैकी यश मिळत आहे.

पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन सेवा हस्तांतरित करून घेतली आहे. वसाहतीत रात्रीच्यावेळीही सफाई करण्यात येते शिवाय कचरा उचलणाºया गाड्यांमधून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या सहकार्याने पीएसएल वेस्ट मॅनेजमेंटने नावडे येथे ओल्या कचºयावर खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या ठिकाणी हॉटेलमधील ओला कचरा आणून प्रक्रि या केली जाते.

दररोज पाच ते सहा टन कचºयावर प्रक्रि या केली जात आहे. या प्रकल्पाकरिता ३३० वॅटचे २६ सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यातून पाच वॅट वीज निर्मिती होते. तीन एचपी क्षमतेचा पंप या ऊर्जेवर पाच तास चालतो, अशी माहिती एस.एल. वेस्टचे संचालक पोपट लोखंडे यांनी दिली.

याबाबत महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, पनवेल महापालिका हद्दीत निर्माण होणाºया ओल्या कचºयाची या प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. यातून महापालिकेला कोणताही खर्च नाही. उलट कचरा उचलणे, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी होणारा खर्च वाचला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

क्षमता वाढवणार
सौर ऊर्जेवर खतनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा दुहेरी फायदा आहे. कचºयाचा प्रश्न निकाली लागला आहे, शिवाय विजेची बचत होत असून बिलापोटी खर्च होणारी रक्कम वाचते. आगामी काळात आणखी सौर पॅनेल टाकून जास्त वीज निर्माण करण्यात येणार आहे.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply