Breaking News

महेश बालदी जिंकणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

2014च्या निवडणुकीवेळी महेश बालदी नवखे होते.  बूथवर त्या वेळी कार्यकर्तेही नव्हते, पण निवडणुकीतील पराभवानंतर आमदार असल्यासारखे ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. प्रत्येक गावात ते पोहोचले आहेत. प्रत्येक कार्यकर्ता आज त्यांना नावाने ओळखतो. पक्षाची ताकद

मतदारसंघात वाढली आहे. 500 कोटींची विकासकामे त्यांनी केली आहेत. या वेळी उरण विधानसभा मतदारसंघात जितके उमेदवार असतील ते सर्व विरुध्द महेश बालदी अशी लढत होईल व 50 टक्के मते घेऊन मोठ्या मतांनी ते विजयी होतील. त्यांना कुणीही पराभूत करू शकत नाही, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेनेच्या साडेपाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 1) भाजपत प्रवेश केला. पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, के. ए. म्हात्रे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे आदी उपस्थित होते.

पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर एक लाखाचे मताधिक्य घेऊन विजयी होतील, तर उरणमधून मी एक लाख मते घेऊन 30 ते 35 हजारांनी विजयी होईन. नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, सेझ अशा प्रकल्पांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळायला हवा. त्यासाठी माझे प्रामुख्याने प्रयत्न असतील. पाच वर्षांत मी 500 कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. माझा कार्य अहवाल घरोघरी पोहोचेल. कर्नाळा बँकेबद्दल मी काही बोलणार नाही, पण ज्यांच्या ठेवी मिळाल्या त्यांचे अभिनंदन, मात्र या बँकेतील पैसे बुडणार हे नक्की. जे सणासुदीला लोकांच्या ठेवी देऊ शकत नाहीत, त्यांना लोक मते काय देणार?, असा प्रश्न महेश बालदी यांनी विचारला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply