कर्जत : बातमीदार
स्वच्छ सर्वेक्षण 2021मध्ये कोकणातील नगर परिषदांमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषद अव्वल ठरली आहे. अमृत नॉन कचरामुक्त शहरात कर्जत नगर परिषदेला थ्री स्टार नामांकन मिळाले होते आणि त्याबद्दल कर्जत नगर परिषदेचा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण-2021चा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा झाला. या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास मंत्री हरदिपसिंग पुरी, केंद्रीय गृहनिर्माण तथा नगरविकास राज्यमंत्री कौशल किशोर आदी उपस्थित होते. कोकणातील शहरी भागातून कर्जत नगर परिषद नॉन अमृत कचरामुक्त शहरांचे प्रमाणित थ्री स्टार मानांकन पुरस्कारात अव्वल ठरली. कर्जत नगर परिषदेच्या नागरध्यक्ष सुवर्णा केतन जोशी आणि पालिका मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी नवी दिल्लीत पालिकेला मिळालेला अमृत नॉन कचरामुक्त शहरांचा अव्वल क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.