नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू-सनरायजर्स हैदराबाद यांच्या दरम्यान शनिवारी झालेल्या सामन्यानंतर पंच नायजेल लोंग यांनी आपला राग खोलीच्या दरवाजावर काढला होता. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असली, तरी अंतिम सामन्यातून त्यांना हटविणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. विराट व लोंग यांचा मैदानावर वाद झाला होता. सामन्यादरम्यानच्या विश्रांतीवेळी लोंग यांनी रागाच्या भरात दरवाजावर लाथ मारली होती. या प्रकरणी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे बीसीसीआयच्या एका अधिकार्याने सांगितले. कर्नाटक राज्य क्रिकेट मंडळाचे सचिव सुधाकर राव यांनी सांगितले की, पंचांनी नुकसानभरपाई दिलेली आहे.