आमदार महेश बालदी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण
उरण : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते जतेंद्र घरत यांचा वाढदिवस सोमवारी (दि. 9) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त त्यांना उरणचे आमदार महेश बालदी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इंडियन ऑईलटॅकिंग लिमिटेड नवघरच्या वतीने गु्रपग्रामपंचायत चिर्ले यांना देण्यात आलेल्या घंटागाडीचे महेश बालदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
या वेळी कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट नवीन चंद्रा, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवीशेठ भोईर, निलकंठ घरत, अतुल खराटे, मिली मोघे, कुमेश इंदुलकर, रंजन घरत, रमन घरत, जगदिश मढवी, मधुकर मढवी, समाधान माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी पुष्पगुच्छ देऊन कामगार नेते जितेंद्र घरत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.