Breaking News

क्रिकेट स्पर्धेचे सोनारीत उद्घाटन

उरण : वार्ताहर

रायगड जिल्ह्यात टेनिस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळले जाते. मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पनवेल, उरणमधील अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे यापुढे याच मैदानावर सिजन क्रिकेटचे आयोजन करावे, जेणेकरून येथील खेळाडूंना चांगले नाव कमवता येईल, असे प्रतिपादन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते सोनारी येथे बोलत होते.

माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक रजनी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे

उद्घाटन शनिवारी (दि. 23) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्यांनी महेश कडू व दिनेश तांडेल यांचे कौतुक केले. उद्घाटन समारंभास जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जसखारचे सरपंच दामूशेठ घरत, कामगार नेते महेंद्र घरत, सुधीर घरत, सुरेश पाटील, भाजप उरण शहर अध्यक्ष नगरसेवक कौशिक शहा, सोनारीच्या सरपंच पूनम कडू, उपसरपंच अश्विनी कडू, सदस्य हेमांगी कडू, जगदीश म्हात्रे, रेश्मा कडू, ममता कडू, नगरसेवक राजेश ठाकूर, जान्हवी पंडित, चेअरमन कृष्णा कडू, सोनारी भाजप अध्यक्ष प्रकाश कडू, मनोज कडू, के. जी. कडू, किशोर कडू, मेघश्याम कडू, सविन म्हात्रे, संदीप कडू, तुळशीदास कडू, एच. एम. कडू, चंद्रकांत घरत, सी. एन. घरत, फुंडे सरपंच वैजयंती म्हात्रे, सुनील पाटील, नरेश कडू, अमित ठाकूर आदी उपस्थित होते. शहीद जवानांना प्रारंभी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply