Breaking News

टपरीधारकांना त्वरित नुकसान भरपाई द्या : अरविंद गायकर

मुरुड : प्रतिनिधी

मुरुड शहरातील समुद्रकिनारी 44 टपरीधारक व छोटे दुकानचालक असून निसर्ग चक्रीवादळात वार्‍याच्या प्रचंड वेगाने वारे वाहिल्यामुळे सर्व दुकाने आडवी होऊन प्रचंड नुकसान झाले होते. भरपाईसाठी पाच लाख मुरुड तहसील कार्यालयास प्राप्त झाले आहेत.

कागदपत्रांची पडताळणी केल्यावर हे वाटप करण्यात येणार होते. परंतु महसूल विभागाने सीआरझेड कायद्याच्या अडचणीमुळे पंचनामे होऊनसुद्धा एकालाही पैसे देण्यात आलेले नाही. त्यामुळे छोटे दुकानदार व टपरीधारक मदतीपासून वंचित राहिले आहेत. हीच रिरस्थती काशीद समुद्रकिनारी असणार्‍या स्टॉल धारकांना लागू पडल्याने येथील टपरीधारक यांनाही मदत मिळू शकली नाही. याबाबत समाजसेवक अरविंद गायकर यांनी टपरी धारकांना मदत देण्याची मागणी केली आहे. मदत मिळाली नाही तर जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी

दिला आहे.

Check Also

आमदार महेश बालदींच्या उपस्थितीत विविध पक्षांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून व विकासात्मक धोरणावर …

Leave a Reply