अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 9) आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त अलिबागमध्ये आदिवासी बंधू-भगिनींनी मिरवणूक काढली होती.
9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो. जगभरातील आदिवासींच्या जागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. रायगड जिल्ह्यातदेखील मंगळवारी हा दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त अलिबाग शहरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी महिला या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणूक विसर्जित करण्यात आली.
Check Also
पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा
मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …
RamPrahar – The Panvel Daily Paper